काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सलमानची रवानगी तुरूंगात झाली आहे, त्याच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सलमानला जोधपूरमधल्या सेंट्रल जेलची हवा खावी लागणार आहे. सलमान ज्या तुरुंगात आहे तिथे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई देखील आहे.

जानेवारी महिन्यात लॉरेन्सनं त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. लॉरेन्स बिष्णोई समाजाचा आहे. या समाजात काळवीटाची पूजा केली जाते. काळवीट शिकार प्रकरणात त्याने सलमानला जानेवारी महिन्यातच जीवे मारण्याची धमकी दिली होती. जोधपूर न्यायालयाच्या परिसरातच त्यानं खुलेआम ही धमकी दिली होती. पण, सलमाननं मात्र लॉरेन्सच्या धमक्यांना भीक घातली नव्हती. खुनं, धमक्या यासारख्या अनेक आरोपांमध्ये दोषी आढळल्यानं लॉरेन्स सध्या तुरुंगाची हवा खात आहे. याच तुरुंगात सलमानला एक रात्र काढावी लागणार असल्यानं सलमानच्या जीवाला धोका पोहोचणार नाही याची काळजी पोलीस घेत आहे.

काळवीट शिकार : एक असा आरोपी, ज्याला २० वर्षांनंतरही नाही पकडू शकले पोलीस

या तुरुंगात लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम ही शिक्षा भोगत आहे. सलमानसोबत सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांच्यावरही आरोप होते. या सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने या सर्वांना न्यायालयानं दोषमुक्त केले.

सलमान ‘शिक्षा’ पायो ! जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा