News Flash

प्रियांका चोप्रा गर्भवती? आई मधू चोप्रा म्हणते…

फॅशन शो दरम्यान प्रियांका गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला दोन महिने उलटत नाही तोच आता प्रियांका गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. प्रियांकानं नुकतीच एका फॅशन शोमध्ये उपस्थिती लावली. या शोदरम्यान प्रियांका गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

प्रियांकाचे शोमधले काही फोटोही व्हायरल झाले. मात्र ती गर्भवती असल्याच्या चर्चांवर तिची आई मधू चोप्रानं स्पष्टीकरण दिलं आहे. हा दोष छायाचित्रकाराचा आहे. प्रियांकाचे फोटो चुकीच्या अँगलनं क्लिक केले आहेत. त्यामुळे ती गर्भवती असल्याचं वाटतं आहे, असं मधू चोप्रा यांचं म्हणणं आहे.

‘प्रियांका गर्भवती असल्याच्या बातम्या वाचून मीच तिला फोन केला त्यावेळी खूपच दमले असल्या कारणानं मी चुकीच्या पद्धतीनं उभी राहिले म्हणूनच फोटोत माझं पोट थोडं मोठं दिसत होतं’ असं उत्तर तिनं दिल्याचं मधू चोप्रा यांनी सांगितलं. प्रियांका डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. राजस्थानमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये पारंपरिक भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 1:27 pm

Web Title: madhu chopra on rumors of priyanka chopra pregnancy
Next Stories
1 कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ने गाठला १०० कोटींचा टप्पा
2 #pulwamaattack : सलमाननं ‘नोटबुक’ मधून हटवलं पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं
3 Trailer : अनोळखी व्यक्तींची प्रेम कथा कैद करणारा ‘फोटोग्राफ’
Just Now!
X