28 February 2021

News Flash

‘पैसा ये पैसा’ गाण्याच्या रिमेकवर थिरकणार माधुरी, अजय आणि अनिल कपूर

या गाण्याच्या निमित्ताने मोठी स्टारकास्ट एकत्र येत असून प्रेक्षकांसाठीही ही पर्वणी ठरणार आहे.

'टोटल धमाल'

नावाजलेल्या कलाकारांची फौज घेऊन प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘टोटल धमाल’ हा चित्रपट सज्ज होत आहे. ‘धमाल’ या कॉमेडी फ्रँचाइजीचा तिसरा भाग ‘टोटल धमाल’चं दिग्दर्शन इंद्र कुमार करत असून माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडीसुद्धा यात झळकणार आहे. सध्या रिमेकचा जमाना असल्याने या कॉमेडी चित्रपटातही ८०च्या दशकातलं गाजलेलं गाणं नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘कर्ज’ या चित्रपटातलं ‘पैसा ये पैसा’ या गाण्याचं रिमेक ‘टोटल धमाल’मध्ये पाहायला मिळणार आहे.

या गाण्याच्या निमित्ताने मोठी स्टारकास्ट एकत्र येत असून प्रेक्षकांसाठीही ही पर्वणी ठरणार आहे. जावेद जाफ्री, अर्षद वारसी, रितेश देशमुख, अजय देवगण, इंद्र कुमार, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, संजय मिश्रा आणि पिटोबाश या गाण्यावर थिरकणार आहेत. ‘सर्व तरुण कलाकारांसोबत गाजलेल्या जुन्या गाण्यावर ठेका धरताना खूप मजा आली,’ असं अनिल कपूर म्हणाले.

वाचा : इरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट 

या गाण्यात सर्वोत्कृष्ट डान्स कोणी केला असा प्रश्न विचारला असता माधुरी म्हणते की, ‘मी उत्कृष्ट नाचले असं मी म्हणणार नाही कारण जावेद आणि अर्षद प्रशिक्षित डान्सर्स आहेत. माझ्याहून उत्तम डान्स त्यांनी केलाय, पण चित्रपटात अभिनेत्रींमध्ये सर्वोत्कृष्ट डान्सर मीच आहे.’ कास्ट आणि बजेटच्या दृष्टीने हा सर्वांत मोठा चित्रपट ठरणार असल्याचं दिग्दर्शक इंद्र कुमार म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 5:25 pm

Web Title: madhuri dixit ajay devgn anil kapoor recreate 80s hit song paisa yeh paisa in total dhamaal
Next Stories
1 इरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट
2 ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या चर्चांवर युजवेंद्र काय म्हणतोय पाहिलं का?
3 सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या सलमानला मिळणार कतरिनाचा आधार?
Just Now!
X