‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत इशा निंबाळकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविड सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आदिती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच अदितीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
अदितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अदिती आणि तिची नवीन गाडी आहे. अदितीने नवीन गाडी घेतली आहे आणि तिने तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी तो व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ्या कुटुंबातील नवीन सदस्य. द्रविडांची क्रुझर, या वर्षाच्या सुंदर सुरूवातीसाठी एक सुंदर भेट” अशा आशयाचं कॅप्शन अदितीने त्या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
अदिती द्रविडने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ईशा निंबाळकरची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेने सगळ्यांची मने जिंकली. तर अदितीची ‘वीरांगणा’ ही शॉर्ट फिल्म खूप गाजली होती. ही शॉर्ट फिल्म पॅरिसच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिक्टिव्हा फिल्म फेस्टिव्हमध्ये दाखवण्यात आली होती. आदिती एक उत्तम अभिनेत्री सोबत उत्तम गायिका देखील आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 5:51 pm