16 January 2021

News Flash

‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील निशा झळकणार मोठ्या पडद्यावर

या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘दिल दोस्ती…’ या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड असल्याने या मालिकेचा दुसरा सिझन म्हणजेच ‘दिल दोस्ती दोबारा’ हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. लहान पडद्यावर काम करणारे कलाकार मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे दिसत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ सिनेमात मंजिरीची झलक आपल्याला दिसणार आहे. ‘दिपाली’ नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा ती या चित्रपटात साकारली आहे.

यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकांद्वारे ती सध्या घराघरात पोहोचली आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स निर्मित ‘पार्टी’ या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत. या सहा जणांची मैत्री चित्रपटात दाखविण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या डिझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये भेट देऊन या दिवसाचा आनंद लुटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 7:21 pm

Web Title: manjiri pupala will be on big screen movie party is releasing on 7th september
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनी मिळणार सुभाषचंद्र बोस यांना जाणून घेण्याची अनोखी संधी
2 टॅक्सिडर्मी केलेल्या जिराफासोबत क्रितीचं फोटोशूट, सोशल मीडियावर जोरदार टीका
3 VIDEO : ‘मीनम्मा’चं याड बाई लागलं दीपिकाला
Just Now!
X