News Flash

‘अशा लोकांना…’, मनोज वाजपेयीने साधला केआरकेवर निशाणा

त्याने ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक मिलाप जावेरी यांनी कमाल आर खानचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाजूने बोलणाऱ्या केआरकेचे धक्कादायक वक्तव्य समोर आणले होते. त्याने सुशांतला अभिनय येत नसल्याचे म्हटले होते. मिलाप यांनी KRKचा व्हिडीओ शेअर करत त्याला फेक म्हटले होते. मिलाप यांच्या या ट्विटला अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी पाठिंबा दिला आहे.

मिलाप आणि हंसल यांचे ट्विट पाहून केआरकेने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने हंसल मेहता आणि मिलाप जावेरी यांच्यावर लवकरच एक रिव्ह्यू आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा रिव्ह्यू ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी हेडफोनचा वापर करा असे देखील त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

केआरकेचे ट्विट पाहून हंसल यांनी संताप व्यक्त केला. माझ्याशी पंगा घेऊ नकोस. मी तुझी नाटकं सहन करुन घेणार नाही. तुझ्या या घेणेरड्या विचारांचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्यापासून लांब रहा. हवं तर याला धमकी समज या आशयाचे ट्विट हंसल यांनी केले होते. त्यांचे हे ट्विट पाहून मनोज वाजपेयीने देखील ट्विट केले आहे.

आता लढाई सुरु झाली आहे ती शेवट पर्यंत लढावीच लागणार. मी पुन्हा सांगतोय आपण अशा लोकांना प्रोत्साहन देतो तेव्हा समस्या वाढतात. तुम्ही सगळ्यांनी अनफॉलो करा त्याची ताकद आपोआप कमी होईल या आशयाचे ट्विट मनोज वाजपेयीने करत केआरकेवर निशाणा साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:34 pm

Web Title: manoj bajpayee lashes out on krk and said that people should unfollow him on social media avb 95
Next Stories
1 सुशांतच्या एक्स मॅनेजरला ओळखत नाही; प्रेमप्रकरणाच्या आरोपांवर सूरज पांचोलीची प्रतिक्रिया
2 सलमान-सोहेल-अरबाजमध्ये कोणाची निवड करणार? लूलियाने दिले भन्नाट उत्तर
3 ‘रामलीला’चा सेट अन् दीप-वीरची केमिस्ट्री; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
Just Now!
X