News Flash

“असं टॅलेन्ट घराणेशाहीच्या शोरुममध्ये सापडत नाही”; संगीतकाराचा टोला

संगीतकाराने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्टार किड्सवर सोशल मीडिद्वारे जोरदार टीका होत आहे. दरम्यान संगीतकार मनोज मुंतशिर याने देखील बॉलिवूडमधील या मक्तेदारीविरोधात आवाज उठवला आहे. त्याने एका लहान मुलाचा व्हिडीओ पोस्ट करुन स्टार किड्सवर निशाणा साधला आहे.

मनोज मुंतशिरने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा गोविंदाच्या ‘एक चुम्मा तू मुझको उधार दे दे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या मुलाचे मनोजने तोंड भरुन कौतुक केले आहे. “असं वेड लावणारं टॅलेन्ट घराणेशाहीच्या शोरुममध्ये नव्हे तर केवळ मातीच्या घरांमध्येच पाहायला मिळतं. या मुलाची हिंमत वाढवा. या मुलाला प्रसिद्ध करा.” अशा आशयाची कॉमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. मनोजने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मनोज मुंतशिर बॉलिवूडमधील नामांकित संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर एक ‘गलियां’, ‘तेरे संग यारा’, ‘कौन तुझे’, ‘दिल मेरी न सुने’, ‘तेरी मिट्टी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे बोल लिहिले आहे. याशिवाय अनेक टीव्ही मालिकांच्या पटकथा देखील लिहिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 1:56 pm

Web Title: manoj muntashir post amazing dance video for comment on nepotism mppg 94
Next Stories
1 १ लाख रुपये विजेचे बिल पाहून अभिनेत्री संतापली, ट्विट करत म्हणाली…
2 करोनामध्ये इंटिमेट सीन कसे होणार शूट?; फोटो शेअर करत अभिनेत्यानं दिलं उत्तर
3 “नामांकित अभिनेता असतानाही मला…”; वर्णद्वेषाबद्दल सांगताना ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधील अभिनेता रडला
Just Now!
X