अलिकडे सोशल मीडियावर रिल्सचा ट्रेंड पाहायला मिळतोय. अनेक सेलिब्रिटीदेखील वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करतानाचे रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर करतात. असाच एक प्रयत्न अभिनेत्री शिवानी रांगोळेने केला. मात्र शिवानीचा हा प्रयत्न पुरता फसल्याचं दिसतंय.
मराठी मालिका आणि सिनेमांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव असते. शिवानीच्या फोटो आणि व्हिडीओला चाहते मोठी पसंती देतात. नुकताच शिवानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती धमाल नाचताना दिसतेय. मात्र पहिल्यांदा रिल करण्याचा तिचा प्रयत्न फसलाय. Reel अपलोड करताना फक्त व्हिडीओ अपलोड झालाय. त्यामुळे शिवानी गाण्याविनाच नाचतेय असं दिसतंय.
View this post on Instagram
‘दिवसाची सुरुवात थोड्याश्या मोनिका डान्सने ‘ असं कॅप्शन देत शिवानीने व्हिडीओ शेअर केलाय. “होय माझ्या पहिल्याच Reel ला म्युझिक नाही!, तुम्हीच काही तरी कल्पना करा, दया करा.. ओके बाय) असं कॅप्शनमध्ये म्हणत शिवानीने व्हिडीओ फसल्याची कबूली दिलीय.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शिवानीच्या व्हिडीओवर कमेंट केलीय. ‘बरं बरं’ म्हणत त्याने शिवानीची थट्टा केलीय. त्याचसोबत अनेक चाहत्यांनी शिवानीच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. शिवानी सध्या स्टार प्रवाहवरील ‘सांग तू येशील का?’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येतेय.