28 February 2021

News Flash

#MeToo : सुभाष घईंविरोधात तक्रार दाखल

सुभाष घई यांच्यावर एका अज्ञात महिलेने बलात्काराचा आरोप केला होता.

#MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक सेलिब्रेटींवर लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नावाचाही समावेश आहे. एका अज्ञात महिलेने घई यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेत्री केट शर्मानेदेखील घईंवर आरोप करत त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

‘सुभाष घई यांनी मला ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी कामानिमित्त बोलावलं होतं. घईंचा फोन आल्यानंतर मी तात्काळ तेथे गेले. त्यानंतर सुभाष यांनी मला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं सांगत एका खोलीत घेऊन गेले आणि तेथे बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप केटने घईंवर केल्याचं ‘एएनआय’च्या वृत्तात म्हटलं आहे. केटने या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, यापूर्वी एका महिलेने सुभाष घई यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. परंतु तिने नाव गोपनीय ठेवण्याची अट ठेवली आहे. सुभाष घई यांनी अनेक वेळा घरी सोडण्याच्या निमित्ताने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप या महिलेने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:04 pm

Web Title: metoo actress kate sharma files formal complaint against subhash ghai
टॅग : MeToo
Next Stories
1 #MeToo : मलाइका अरोरा साजिदच्या मदतीसाठी रिंगणात
2 #MeToo : ‘दोन वर्षापूर्वी माझं कोणीच ऐकलं नाही’
3 ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चं दुसरं पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X