News Flash

सायली, रियासह भूषणचा ‘मनमौजी’ अंदाज

सायली संजीवच्या पदरात आणखी एक चित्रपट

२०२० या वर्षात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे हे वर्ष साऱ्यांच्याच लक्षात राहण्यासारखं आहे. या वर्षात राजकीय वर्तुळापासून ते कलाविश्वापर्यंत अनेक गोष्टी चर्चेत आल्या. यामध्येच आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेत्री सायली संजीव, रिया नलावडे आणि अभिनेता भूषण पाटील या तिघांची. सध्या सोशल मीडियावर या तिघांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी सायली संजीव आता मोठ्या पडद्यावर झळकू लागली आहे. काही लोकप्रिय चित्रपट केल्यानंतर सायली लवकरच मनमौजी या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या सायलीच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. यामध्येच सायलीसोबत अभिनेता भूषण पाटील व रिया नलावडे हे कलाकारदेखील चर्चेत आले आहेत. आगामी मनमौजी या चित्रपटात हे दोन्ही कलाकार सायलीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

पाहा : स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडने केला प्रेयसीसोबत साखरपुडा; पाहा फोटो

 

शीतल शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विनोद मलगेवार यांनी केलं आहे. या चित्रपटातून प्रेमाची एक नवीन व्याख्या प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. गोल्डन गेट मोशन पिक्चर्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून यापूर्वी गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने ‘गुलाबजाम’, ‘लॉस्ट अँड फाउंड’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 3:39 pm

Web Title: new marathi movie manmauji coming soon sayali sanjeev bhushan patil and riya nalawde ssj 93
Next Stories
1 ‘क्राइम पेट्रोल’मधून अनुप सोनी बाहेर? ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
2 न्यूड फोटोशूटवर मिलिंद सोमणचं प्रत्युत्तर; “देवानं आपल्याला…”
3 कंगना रणौतवर कोसळला दु:खाचा डोंगर; चाहत्यांसमोर झाली भावूक
Just Now!
X