27 October 2020

News Flash

तगडी स्टारकास्ट असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबरच काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

मी शिवाजी पार्क

सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी विविध धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक सामाजिक मुद्द्यावर भाष्य करताना दिसतात. या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये महेश मांजरेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबरच काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्यामुळे लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
‘न्याय देवता आंधळी असते.. आम्ही डोळस होतो’, अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीचा समावेश करण्यात आला असून नुकतच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. काही दिवसापूर्वी दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.

दिलीप साहेबराव यादव आणि सिद्धार्थ केवलचंद जैन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शिवाजी साटम, अशोक सराफ आणि सतीश आलेकर ही तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गौरी पिक्चर प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारा हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 9:51 am

Web Title: new marathi movie me shivaji park direct mahesh manjrekar
Next Stories
1 Video : ‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर प्रदर्शित
2 #Happy Birthday Kareena : सैफ अली खानच्या आधी करिनाच्या आयुष्यात होता ‘हा’ खान!
3 सुपरस्टार ते देवाशप्पथ
Just Now!
X