21 September 2020

News Flash

CINTAA कडून बाबा राम रहिमचा परवाना रद्द

त्याच्या 'हायवे लव्ह चार्जर' या अल्बमने अनेक विक्रम मोडीत काढले होते.

गुरमीत बाबा राम रहिम

‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने ( CINTAA ) स्वयंघोषित रॉक संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक गुरमीत बाबा राम रहिमचा व्यवसाय परवाना रद्द केलाय. बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहिमला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर CINTAAने हा निर्णय घेतला.

‘एएनआय’ दिलेल्या वृत्तानुसार, राम रहिम सिंगचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे CINTAA मधील सदस्यांनी एकमताने त्याचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच राम रहिमने त्याच्या आगामी ‘एमएसजी ऑनलाइन गुरुकुल’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते.

वाचा : जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीविरोधात खटला, उच्च न्यायालयाचे आदेश

जगाने कधीही न पाहिलेल्या गोष्टी आणि सध्याची पिढी विसरत चालेल्या मुल्यांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मोशन पोस्टर शेअर करत त्याने लिहिलेलं की, ‘तुमची प्रतिक्षा संपलीये. #MSGOnlineGurukul चा फर्स्ट लूक पाहा.’ काही महिन्यांपूर्वीच बाबा राम रहिमचा ‘जट्टू इंजिनीअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याची मुलगी हनीप्रीत सिंगने काम केले होते.

वाचा : अभिनेत्री संजीदा शेख आणि तिच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

आपल्या अनुयायांना मद्य, अमली पदार्थ आणि अनैतिकतेपासून दूर ठेवण्यासाठी राम रहिम अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचा, असे त्याच्या अनुयायांचे म्हणणे होते. त्याच्या ‘हायवे लव्ह चार्जर’ या अल्बमने अनेक विक्रम मोडीत काढले होते. केवळ तीन दिवसांत या अल्बमच्या ३० लाख सीडीज विकल्या गेल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 11:06 am

Web Title: on grounds of criminality cintaa cancels work permit of msg actor gurmeet ram rahim singh
Next Stories
1 Bhoomi Song Daag: काळजाला भिडणारे ‘दाग’
2 मृत्यूनंतरही सुरू राहील इंदर कुमारवरील बलात्काराचा खटला
3 सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल
Just Now!
X