सध्याच्या तरुणांना भावणारी अशा कथा घेऊन ‘वन बाय टू’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रिलेशनशिप, त्यात मिळणारा दगा आणि भावनांची होणारी फरपट यांभोवती सीरिजची कथा फिरते. निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित ‘वन बाय टू’ ही मराठी वेब सीरिज १९ नोव्हेंबरपासून एमएक्स प्लेअर, एअरटेल एक्सट्रिम आणि व्हीआय मूव्हीज म्हणजेच वोडाफोन प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरीजचं लेखन आणि दिग्दर्शन निशांत गजभे आणि रोहित निकम यांनी केलं असून निशांत गजभे दिग्दर्शक आहेत.

सीरिजबद्दल निखिल रायबोले सांगतात की, “‘वन बाय टू’ ही कॅफे मराठीची १५वी मराठी वेब सीरिज आहे. डिजिटल क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही नव्या कल्पना, नव्या गोष्टी आणि नव्या विचारांना वाट मोकळी करून देणाऱ्या लेखकांची फौज तयार करतोय. सोबतच बड्या दिग्दर्शकांचा देखील त्यात समावेश असणार आहे.”

Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
Majhya Navaryachi Bayko fame actor mihir Rajda played Bhakt Pralhad and Young Sudama in TV Serial Shri Krishna of Ramanand Sagar
रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम

या ‘वन बाय टू’ वेब सीरिजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. एक वेगळ्या आणि आकर्षक अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसणार आहे.

भुपेंद्रकुमार नंदन सांगतात की, “आपल्या आयुष्यात असणारे प्रत्येक नाते हे दोन गोष्टींवर टिकून असते. ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि विश्वास. अशाच प्रेमकथेवर आधारित ही ‘वन बाय टू’ मराठी वेब सीरिज आहे.”