News Flash

‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, शशांक केतकर ट्रोलरवर संतापला

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यावर भडकला शशांक केतकर

अनेक कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. पण बऱ्याच वेळा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही कलाकार याकडे दुर्लक्ष करतात तर काही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. असेच काहीसे अभिनेता शशांक केतकरसोबत झाले आहे. गलिच्छ भाषेत ट्रोल करणाऱ्याला युजरला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

सध्या शशांक ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. एका चाहत्याला त्याची ही भूमिका आवडत नसल्याने त्याने गलिच्छ भाषेत कमेंट करत प्रतिक्रिया दिली. ती कमेंट पाहून शशांक शांत बसला नाही. त्यावर उत्तर देत शशांक म्हणाला, ‘कलाकरांशी आदराने वागा, पुण्य लाभेल.’ शशांकची ही कमेंट पाहून ट्रोलरने देखील उत्तर दिले. त्या दोघांमधील वाद वाढतच गेला.

पुढे शशांक म्हणाला, ‘तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल, तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अॅक्टिंग सुरु करा आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघायची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकार सुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टींना लॉजिक नाही वैगरे कमेंट एकीकडी आणि ढुंगण वैगरे शब्द वापरुन रिअॅक्ट होणे एकीकडे.’

‘आम्ही फक्त चेहरे असतो. आमच्यावर किमान १५ जणं असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काही तरी करुन बघायचं होतं आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी पाहायचं होतं. ही मालिका आहे.. अजून खूप गोष्ट बाकी आहे… एक निगेटिव्ह पात्र असतं म्हणूनच पॉझिटिव्ह वागणारे हिरो असतात. मेणबत्तीचं अस्तित्व तेव्हाच जेव्हा बाजूला काळाकुट्ट अंधार असतो’ असे शशांक त्या ट्रोलरला उत्तर देत म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:59 pm

Web Title: pahile na mi tula actor shashank ketkar slamis trolls avb 95
Next Stories
1 ‘फ्रेंड्स’ पुन्हा येतायत…तेही एका मोठ्या सरप्राईझसह!
2 ‘जेठालाल’ने घेतली करोना लस, फोटो पोस्ट करत म्हणाले…
3 मला अटक झालेली नाही; एजाज खानची पोस्ट चर्चेत
Just Now!
X