09 July 2020

News Flash

‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा

डाकूंच्या जगात सुपरहिरो हार्ले क्विनची एन्ट्री

‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ ही आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मूव्ही सीरिजपैकी एक म्हणून ओळखली जाते. या चित्रपटांच्या लोकप्रियतेमागे आभिनेता जॉनी डेपचा सिंहाचा वाटा आहे. मात्र चाहत्यांसाठी दु:खाची बाब म्हणजे या सीरिजमधून जॉनीला डिस्ने स्टुडिओने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या ऐवजी आता हार्ले क्विन उर्फ अभिनेत्री मार्गोट रॉबी मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे.

जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी अॅम्बर हर्डने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळेच जॉनीला डिस्ने स्टुडिओने पायरेट्स सीरिजमधून बाहेर केलं आहे. त्याच्या ऐवजी आता मार्गोट रॉबी मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. पायरेट्सची संपूर्ण सीरिज जॉनीने साकारलेल्या जॅक स्पॅरो या व्यक्तिरेखेभोवती फिरते. परिणामी ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ आता नव्या कथानकासह रिब्यूट केलं जाणार आहे.

‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या सीरिजमध्ये जॉनी डेपने ‘जॅक स्पॅरो’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळेच पायरेट्स सीरिज इतकी लोकप्रिय झाली. जॅक स्पॅरोसाठी जॉनीला ऑस्कर नामांकन सुद्धा मिळालं होतं. जॅक स्पॅरोमुळेच आज जॉनी डेप हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. जॉनी डेपला पायरेट्स सीरिजमधून बाहेर काढल्यामुळे चाहते मात्र नाराज आहेत. कारण अॅम्बरने जॉनीविरोधात केलेले कुठलेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 4:05 pm

Web Title: pirates of the caribbean johnny depp replaced by harley quinn mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनमुळे अभिनेता आर्थिक संकटात; १४०० किलोमीटर प्रवास करत पोहोचला घरी
2 ज्यांना लोकशाही संपण्याची भीती वाटते, त्यांनी निवडणुकीत उतरावं -मनोज वाजपेयी
3 हरहुन्नरी कलाकार संजय मोने येतायत लोकसत्ता डिजिटल अड्डावर
Just Now!
X