News Flash

Trailer : इस ‘नोटबुक’ में हम हमेशा साथ रहेंगे!

नात्यातील विरह, ओढ या ट्रेलरमध्ये उत्तमरित्या मांडण्यात आली आहे.

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. करिअर मार्गी लावणाऱ्या ‘भाईजान’ने आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिचं ही करिअर घडविण्यासाठी मदत केली आहे. सलमानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटात प्रनुतन झळकणार असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये प्रनुतन आणि नवोदित अभिनेता जहीर झक्बाल झळकले आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, प्रेम आणि नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यात आलं आहे. नात्यातील विरह, ओढ या ट्रेलरमध्ये उत्तमरित्या मांडण्यात आली आहे.

दरम्यान, प्रदर्शित झालेला ट्रेलर केवळ प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या देखील पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ‘नोटबुक’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत आहे, तर दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 4:30 pm

Web Title: pranutan bahl zaheer iqbal notebook official trailer out
Next Stories
1 Photo : पूजा बेदी लवकरच बांधणार या व्यावसायिकाशी लग्नगाठ
2 ‘गली बॉय’ने गाठला १०० कोटींचा टप्पा
3 पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय
Just Now!
X