News Flash

हॉलिवूडमध्ये ‘द रॉक’ला मागे टाकत प्रियांका बनली नंबर एकची सेलिब्रिटी

प्रियांकाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले गेलेले

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर जगाला प्रियांकाने वेड लावलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून प्रियांकाच्या नावाची वर्णी लागली आहे. या यादीत तिने बेवॉच स्टार ड्वेन जॉन्सन आणि ट्रिपल एक्स स्टार विन डिझेललाही मागे टाकले आहे.

Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

परदेशातल्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांका फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि गुगल प्लसवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती म्हणून प्रियांकाचे नाव अग्रणी आहे. एम व्ही पिन्डेक्स या सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनीने लोकप्रिय सेलिब्रिटींचा सोशल मीडियावर असणारा सक्रिय वावर यातून एक संशोधन केले होते. तसेच एका आठवड्यात प्रत्येक सेलिब्रिटीला किती जणांनी फॉलो आणि सबस्क्राइब केले याचा एक तक्ता तयार केला.

प्रियांकाला तिच्या क्वांटिको या मालिकेमुळे जगभरात प्रसिद्धी मिळाली. प्रियांका ट्विटरवर सर्वात जास्त सक्रिय असते. याच आधारावर तिला हे मानांकन देण्यात आले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर ड्वेन जॉन्सन आहे, ज्याने प्रियांकासोबत बेवॉच या सिनेमात एकत्र काम केले होते. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेतील सुप्रसिद्ध विनोदवीर केविन हार्ट आहे. तर एफ्रोन, जेनिफर लोपेझ, विन डिझेल आणि गेल गलोट यांचे नावही या यादीत आहे.

गेल्या आठवड्यात प्रियांकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवरुन अनेक वादही निर्माण झाले होते. मोदींना भेटायला गेली असताना प्रियांकाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले गेलेले. पण प्रियांकाने तिच्या आईसोबतचा अजून एक फोटो शेअर करत ट्रोल करण्यांना जसास तसे उत्तर दिले.

TTMM Movie Review: जुनीच गोष्ट नव्या स्वरूपात

बी- टाऊनची ही देसी गर्ल सध्या बॉलिवूडमधील सर्वांत व्यस्त अभिनेत्री मानली जातेय. तिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटानंतर येत्या काळात ती ‘अ किड लाईक जेक’ आणि ‘इझन्ट इट रोमॅण्टिक’ या आणखी दोन हॉलिवूड सिनेमांत काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 11:57 am

Web Title: priyanka chopra is become number 1 in social media popularity
Next Stories
1 Father’s Day 2017 : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’
2 Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे
3 वडोदऱ्यातील चेंगराचेंगरीप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Just Now!
X