News Flash

प्रियांकाने बॉयफ्रेंडल कपाटात लपवलं, मावशीने आईला फोन केला अन्..

अमेरिकेत शिक्षण घेत असताना प्रियांका मावशीकडे राहात होती.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशीत झाले. आयुष्यात आलेले चांगले, वाईट अनुभव, तिच्या खाजगी आयुष्याबद्दलचे काही खुलासे, बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, या बद्दल तिने या पुस्तकात लिहिले आहे. दरम्यान तिने दहावीत शिकत असतानाचा एक किस्सा देखील सांगितला आहे.

प्रियांका शिक्षण घेत असताना अमेरिकेत मावशीसोबत राहत होती. दहावीत असताना ती बॉब नवाच्या एका मुलाला डेट करत होती. एक दिवस बॉब आणि ती घरात एकत्र टीव्ही पाहात होते. त्यावेळी अचानक प्रियांकाची मावशी घरी आली. घाबरुन प्रियांकाने बॉबला तिच्या कपाटामध्ये लपण्यास सांगितले. पण मावशीला कळालं आणि तिने प्रियांकाच्या आईला फोन करुन याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन

प्रियांकाने पुस्तकात लिहिले आहे की, ‘मी दहावीत शिक्षण घेत असताना बॉब नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडले होते. अमेरिकेत शिक्षण घेत असताना मी नातेवाईकांकडे राहत होते. एक दिवस घरात कोणी नव्हतं. मी आणि बॉब टीव्ही पाहात होता. मी सहज खिडकी बाहेर पाहिलं तर मावशी पायऱ्या चढून घराच्या दिशेने येत होती. मावशी कधीही इतक्या लवकर घरी आली नव्हती. पण त्या दिवशी ती दोन वाजताच घरी आली. बॉबला मी माझ्या कपाटात लपायले सांगितले.’

‘मावशी घरात येताच प्रत्येक खोली काजळीपूर्वक पाहू लागली. मी माझ्या खोलीमध्ये पुस्तक घेऊन बसले होते. जेणे करुन मी अभ्यास करत आहे असे तिला वाटेल. पण मावशी खोलीमध्ये आली आणि तिने मला कपाट उघडायला सांगितले. कपटातून बॉबला बाहेर येताना पाहून तिला प्रचंड राग आला. तिने माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं की प्रियांका माझ्याशी खोटं बोलली यावर माझा विश्वासच बसत नाही. तिच्या कपाटातून एक मुलगा बाहेर आला’ असे प्रियांकाने पुस्तकात लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 6:16 pm

Web Title: priyanka chopra share her 1oth std boyfriend story in book unfinished a memoir avb 95
Next Stories
1 Maharani Trailer: सोनी लिवच्या वेब सिरीजमध्ये हुमा कुरेशी बनली ‘महाराणी’; जबरदस्त ट्रेलर रिलीज
2 कॉमेडी क्वीन भारती सिंहला तिची दुरावलेली लेक सापडली; म्हणाली ‘या’ कारणासाठी ठेवलं होतं दूर
3 ‘खूप विचित्र होतं..’,अनुराग कश्यपची लेक आलियाने सांगितला पहिल्या किसचा किस्सा
Just Now!
X