बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे चर्चेत होती. तर त्यानंतर ऑपेरा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शोमध्ये तिने हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. प्रियांकाने नुकतच अमेरिकेत ‘सोना’ तिचं पहिलं भारतीय हॉटेल सुरु कलेय. तिच्या या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियांकाचा एक फोट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रियांकाने नुकताच तिचा एक जुना फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्य़े जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
View this post on Instagram
प्रियांकाने तिचा एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती 19 वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. बिकनीतील हा फोटो शेअर करत प्रियांने दिलेल्या कॅप्शनने चर्चा रंगत आहेत. “लाजणं? त्याबद्दल कधी एकलं नाही.” असं कॅप्शन देत या फोटोला तिने “बिंदी आणि बिकनी” असं हॅशटॅग दिलं आहे. प्रियांकाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत या फोटोला 16 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढरी पॅन्ट घातल्याचं दिसतंय. बोल्ड कपडे घातलेले असतानाही तिने त्यावर टिकली लावली आहे. प्रियांकाने या आधीदेखील अनेकदा बोल्ड कपड्यांवर टिकली लावणं पसंत केलंय.
प्रियांका चोप्राने अगदी कमी वयात मॉडलिंगला सुरुवात केली होती. अठराव्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करत असताना आलेले अनुभव प्रियांकाने तिच्या पुस्तकात मांडले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2021 9:42 am