19 September 2020

News Flash

आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना राखीचं सडेतोड उत्तर

सध्याच्या घडीला ती बऱ्याच स्टेज शोमध्ये व्यग्र असल्याचंही म्हटलं जात आहे.

राखी सावंत, rakhi sawant

‘आयटम गर्ल’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली राखी सावंत सध्या चर्चेत असते ते म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा एखाद्या वादग्रस्त विधानामुळे. बऱ्याच दिवसांपासून ती कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमधून झळखली नसली तरीही तिच्याभोवती असणारं चर्चा आणि वादांचं वलय मात्र राखीला चर्चेत आणण्यास पुरेसं ठरतं. सध्याही ती अनेकांचं लक्ष वेधत आहे ते म्हणजे सोशल मीडियावर एका युजरला दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे.

राखी इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. मुख्य म्हणजे तिच्या प्रत्येक पोस्टवर अनेक कमेंट्सही येतात. ज्यामध्ये तुलनेने आक्षेपार्ह कमेंटचं प्रमाण जास्त असतं. याचविषयी राखीला एका युजरने प्रश्न विचारत ‘राखी मी नुकतच तुझ्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट्स वाचल्या. ज्यामध्ये बऱ्याच आक्षेपार्ह कमेंट्स होत्या. तू या सर्व कमेंट्सचा सामना कशा प्रकारे करतेस?’, अशी कमेंट लिहिली.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देत राखीने लिहिलं, ‘मी ते वाचते, त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्या कमेंट्स डिलीट करते. त्या सर्व आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या मंडळींना महिलांविषयी आदर नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. ते अगदी वेंधळे आहेत.’ राखी सहसा तिच्या सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करते खरी. पण, यावेळी मात्र तिने या कमेंटचं उत्तर देण्याचं ठरवत निंदा करणाऱ्यांमुळे किंवा आक्षेपार्ह कमेंट्स् करणाऱ्यांमुळे आपल्याला फारसा काहीच फरक पडत नसल्याचंच तिने स्पष्ट केलं आहे. राखी आजवर विविध कारणांनी प्रकाशझोतात राहिली आहे. सध्याच्या घडीला ती बऱ्याच स्टेज शोमध्ये व्यग्र असल्याचंही म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 9:13 am

Web Title: rakhi sawants shocking reply to haters on social media
Next Stories
1 बाप झाल्यानंतर एका तासांत शाहिदचे अकाऊंट हॅक; कतरिनावर आक्षेपार्ह ट्विट
2 आता येणार ‘अरेंज मॅरेज’ चा ट्रेंड!
3 रणबीर, नीतू आणि मलाही ती आवडते, समजलं?, ऋषी कपूर बरसले
Just Now!
X