कलाविश्वात सध्या बायोपिकची एक मोठी लाटच आली आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे व्यक्तीमत्त्व असो किंवा मग ऐतिहासिक व्यक्तीरेखा असो, बायोपिकची बॉक्स ऑफिसवर चलती आहे. एखादी खास व्यक्तीरेखा बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं स्वप्न अनेक कलाकारांचं असतं. बायोपिकच्या माध्यमातून ती व्यक्तीरेखा काही वेळासाठी का होईना, पण जगण्याची संधी त्या कलाकाराला मिळते. अभिनेत्री रिंकू राजगुरूला अशाच एका महान व्यक्तीचा बायोपिक साकारायचा आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ही इच्छा बोलून दाखवली.
रिंकूला भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा बायोपिक साकारायची इच्छा आहे. सावित्रीबाई फुलेंनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. असं महान व्यक्तीमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारायची संधी मिळाल्यास ती नक्की मी स्वीकारेन, असं रिंकू म्हणाली.
आणखी वाचा : ‘तान्हाजी’ चित्रपटातील इतिहास किती खरा किती खोटा? ऐका त्यांच्या वंशजांकडून
सध्या रिंकू तिच्या आगामी ‘मेकअप’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून ती एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू आणि चिन्मय उदगीरकर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 4:53 pm