मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक असलेला रवी जाधव आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘बालक-पालक’ या सुपरहिट चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहावयास मिळणार आहे. आगामी ‘बँजो’ या हिंदी चित्रपटातून ते आपली जादू दाखवणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलीवूड सुंदरी नर्गिस फाखरी हीदेखील मुख्य भूमिकेत दिसेल.
समाजात दुर्लक्षित घटक असलेल्या बँजो वादकांवर या चित्रपटाची कथा चित्रीत करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बँजो वादकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असेल. रितेश देशमुख यामध्ये बँजो प्लेअरची भूमिका साकारणार असून, नर्गिस डीजेच्या भूमिकेत दिसेल. आता तुम्ही म्हणाल हिंदी चित्रपट आहे तर नर्गिस मराठी कशाला शिकतेय? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. नर्गिस चित्रपटातील भूमिकेसाठी मराठी शिकत नाहीय. तर रितेश आणि रवीसह ह्या चित्रपटासाठी काम करणारी अनेक मंडळी मराठी आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर अनेकदा मराठीत संभाषण होत. या सर्वांचे मराठीतील संभाषण ऐकून नर्गिसची मराठी भाषेशी चांगली ओळख होऊ लागलीय. हो, नाही, भात, भाजी सारखे सोप्पे मराठी शब्द आता ती बोलू लागल्याचे कळते.
असो, हिंदी भाषासुद्धा महत्प्रयासाने बोलणारी नर्गिस मराठी शिकण्याचा निदान प्रयत्न तरी करतेय हे प्रशंसा करण्यासारखे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2016 रोजी प्रकाशित
रवी जाधवच्या चित्रपटासाठी नर्गिस फाखरी घेतेय मराठीचे धडे!
महाराष्ट्रातील बँजो वादकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असेल.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 01-02-2016 at 10:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh paired with nargis fakhri for banjo