13 July 2020

News Flash

रजनिकांत करोना पॉझिटीव्ह सांगणारा जोक शेअर केल्याने अभिनेता झाला ट्रोल

अभिनेत्याने ट्रोल करण्यांना उत्तर देखील दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच एका अभिनेत्याने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत करोना पॉझिटीव्ह असल्याचा जोक शेअर केला आहे. तसेच त्याला या जोकमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

हा अभिनेता म्हणजे रोहित रॉय आहे. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर अंदाजात पोस्ट शेअर केली होती. पण रजनिकांतच्या चाहत्यांनी रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

‘रजनिकांत करोना पॉझिटीव्ह आले. आता करोनाला क्वारंटाइन करण्यात आले आहे’ असे रोहितने पोस्टमध्ये म्हटले होते. पण त्याची ही पोस्ट रजनिकांतच्या चाहत्यांना अजीबात आवडलेली दिसत नाही. त्यांनी रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्रोल झाल्यानंतर काही वेळातच रोहितने पोस्टवर कमेंट केली आहे. ‘मित्रांनो जरा शांत व्हा… एक जोक केवळ जोक असतो.. हा एक रजनिकांत सरांच्या स्टाइलमधला टीपिकल जोक होता आणि मला या जोकने सर्वांना हसवायचे होते. कमेंट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीने कोणत्या भावनेने पोस्ट केलं आहे हे देखील पाहायला हवे’ असे त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 8:46 pm

Web Title: rohit roy trolled after he posted a joke on rajinikanth tested positive for corona avb 95
Next Stories
1 “तुला मजुरांचं दु:ख दिसत नाही का?”; सारा अली खानवर अभिनेता संतापला
2 बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या तिघांची करोना चाचणी निगेटीव्ह
3 अभिनेत्याच्या मदतीला आला सोनू सूद धावून, फोन करुन केली विचारपूस
Just Now!
X