News Flash

VIDEO: विशेष संदेशासह सलमानने पूर्ण केलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’

सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमान खान

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळते. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकजण बाटलीवरील झाकण बाटली हलू किंवा पडू न देता काढताना हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. ‘बॉटल कॅप चॅलेंज’चे व्हिडीओ अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकताच बॉलिवूडचा सर्वांचा लाडका दबंग खाननेदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याने हे चॅलेंज पूर्ण करत एक महत्वाचा संदेश देखील दिला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करताना व्हिडीओ शेअर केला आहे. पण सलमानने बाटलीवरील झाकण पायाने न काढता एकदम मजेशीर अंदाजात काढले आहे. त्याने फूंकर मारून बाटलीवरील झाकण पाडले असून पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यापूर्वी बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार, सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, अभिनेत्री सुष्मिता सेनसारख्या इतर कलाकारांनी ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारून व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकारही मागे नाहीत. सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांनीदेखील अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याच्या मराठमोळ्या चिमुकलीचा देशभक्तीपर भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सलमान सतत कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सलमान व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. सलमानचे ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ‘भारत’च्या यशाने त्याला दिलासा मिळाला आहे. तसेच सलमानचे ‘दबंग ३’, ‘किक’ आणि ‘इंशाअल्लाह’ हे तिन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 11:10 am

Web Title: salman khan completed bottle cup challenge in different way and give social message avb 95
Next Stories
1 World Cup 2019 Final: बावळट नियम, लढवय्ये न्यूझीलंड अन् बरंच काही, पाहा सेलिब्रिटी काय म्हणाले..
2 ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी
3 Photo : ‘पती पत्नी और वो’च्या सेटवरील कार्तिकचा लूक व्हायरल
Just Now!
X