News Flash

सलमानच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी, लॉकडाऊनमुळे ‘राधे’चे प्रदर्शन लांबणीवर

या चित्रपटात सलमान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य भूमिकेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या आगामी चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘राधे’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी सलमानने दिली होती. मात्र, करोनाचा वाढता संसर्ग पाहता ‘राधे’ आता प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

कबिर सिंग बेदी यांच्या बुक लॉन्चवेळी फेसबूक लाइव्हमध्ये सलमानने यावर वक्तव्य केलं आहे. “आम्ही अजूनही ‘राधे’ला ईदवर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. परंतु, लॉकडाउन पुढे सुरू राहिल्यास आम्हाला कदाचित पुढच्या वर्षी ईदवर चित्रपट प्रदर्शित करावा लागेल.”

पुढे सलमान म्हणाला, “परंतु जर लॉकडाउन उघडला आणि लोक स्वत: ची काळजी घेत असतील, मास्क घालत असतील आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करत असतील, त्यांनी आता बाहेर जायचे बंद केले, सरकारने दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन केले, तर हे सगळं लवकरच संपेल. हे सगळं झालं तर, ‘राथे’ या वर्षी ईदला प्रदर्शित होईल.”

करोनाचा वाढता संसर्ग पाहता, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली, आणि आता ‘राधे’च्या प्रदर्शनाची तारिख सुद्धा पुढे ढकलली जाऊ शकते.

‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 11:49 am

Web Title: salman khan on radhe your most wanted bhai release date if lockdown continues we may have to push it to next eid dcp 98
Next Stories
1 Birthday Special: पहिल्या नजरेत प्रेम, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची लव्हस्टोरी
2 स्वदेशीचा जागर करणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले,..
3 १८ क्रू मेंबर्स पाठोपाठ ‘डान्स दीवाने ३’च्या परिक्षकाला करोनाची लागण
Just Now!
X