News Flash

सुशांतसोबत असलेल्या नात्यावर साराने दिली कबुली?

आज एनसीबीकडून दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची चौकशी झाली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करत असलेल्या चौकशीमध्ये सारा अली खानचे नाव समोर आले. एनसीबीकडून तिची आज चौकशी सुरु होती. दरम्यान तिने सुशांतसोबत असलेल्या नात्याच्या कबुली दिली आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, साराने ती आणि सुशांत रिलेशमध्ये असल्याची कबुली दिली आहे. २०१८मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांची ओळख झाल्याचे साराने सांगितले. बॉलिवूडमधील काही लोकांमुळे ब्रेकअप केल्याच्या चर्चा खोट्या असल्याचे देखील साराने सांगितले आहे.

दरम्यान साराने सुशांत सोबत थायलंड ट्रिपवर गेल्याचेही कबुल केले आहे. तपासादरम्यान थायलंड ट्रिपमधील एका पार्टीतील सारा आणि सुशांतचा व्हिडीओ समोर आला होता. तसेच सुशांत ड्रग्ज घेत असल्याचे साराने सांगितले आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 7:30 pm

Web Title: sara ali khan admits to relationship with late actor avb 95
Next Stories
1 वेगळ्या लूकमुळे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणं ही झालं कठिण
2 ‘अप्रतिम..’, सुमीत राघवनने शेअर केला बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडीओ
3 विनीत भोंडेने खरेदी केली कार; पाहा फोटो
Just Now!
X