News Flash

“एक मित्र म्हणून मी फक्त…”, ‘यासाठी’ सतीश कौशिक यांनी प्रेग्नंट नीना गुप्ता यांना केलं होतं प्रपोज

"नीनाने ज्या संघर्षाचा सामना केलाय त्यासाठी नेहमी मला तिचं कौतुक वाटतं तिने खूप बहादूरीने आयुष्यातील संकट आणि अडथळ्यांचा सामना केलाय."

Photos: neena Gupta/Instagram, Varinder Chawla/Indian Express)

अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी आजवर कधीही न व्यक्त केलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीना गुप्ता यांनी त्यांना आलेल्या बॉलिवूडमधील अनुभवांसोबतच अनेक खासगी गोष्टींचा या पुस्तकात उलगडा केलाय.

नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ .या आत्मचरित्र्यात दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी त्यांना प्रपोज केलं होतं. या गोष्टीचाही उलगडा केला आहे. ज्यावेळी नीना गुप्ता गरोदर होत्या तेव्हा सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती. शिवाय ते होणाऱ्या बाळाचा स्विकार करण्यासही तयार होते. मात्र त्यावेळी नीना गुप्ता यांनी लग्नाचा हा प्रस्ताव नाकारला.

तिच्या बोलण्याच्या आणि राहणीमानाच्या स्टाइवर सर्वच फिदा होते

यानंतर आता सतीश कौशिक यांनी त्यांच्या भावना व्य़क्त केल्या आहेत. बॉम्बे टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सतीश कौशिक यांनी त्या प्रसंगाचा उलगडा केला आहे. या मुलाखतीत ते म्हणाले, ” १९७५ पासून आमची मैत्री आहे. आम्ही करोलबागमध्ये एकाच परिसरात राहत होतो. दिल्ली विद्यापीठात आम्ही एकत्र शिक्षण घेतलंय. नीना जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये यायची तेव्हा सगळ्यांच लक्ष वेधून घ्यायची. तिच्या बोलण्याच्या आणि राहणीमानाच्या स्टाइलवर सर्वच फिदा होते. माझ्यानंतर काही वर्षांनी तिने देखील एनएसडीत सहभाग घेतला. नंतर सिनेसृष्टीत आम्ही दोघांनी आपापली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. आम्ही काही सिनेमे एकत्र केले आहेत. आम्ही आपापल्या कामात व्यस्त होतो. मात्र जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा जुन्या आठणींना उजाळा द्यायचो. नीनाने ज्या संघर्षाचा सामना केलाय त्यासाठी नेहमी मला तिचं कौतुक वाटतं तिने खूप बहादूरीने आयुष्यातील संकट आणि अडथळ्यांचा सामना केलाय. खास करून जेव्हा ती गरोदर होती.” असं सतीश कौशिक या मुलाखतीत म्हणाले.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बापूजींचं हे रुप पाहिलंत का?; पत्नी आहे खूपच ग्लॅमरस

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: ‘हळद लागली…’, सायली संजीवचा हळदी समारंभासाठी खास लूक!

एक मित्र म्हणून मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं

पुढे सतीश कौशिक म्हणाले, ” एका मुलीने लग्न न करताचं बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेणं याचं मी कौतुक करतो. मात्र मी एक चांगला मित्र म्हणून त्यावेळी तिच्यासोबत होतो. एक मित्र म्हणून मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं होतं. मी तिच्यासाठी चिंतेत होतो. मला तिला एकटं पडू द्यायचं नव्हतं. तिने पुस्तकात म्हंटलंय मी तिला प्रपोज केलं. मात्र ती मिक्स फिलिंग होती. ती मस्करी हीतो, काळजी होती तिचा सन्मान होता. मी माझ्या बेस्ट फ्रेण्डला तिला माझी गरज असताना सपोर्ट केला.” असं म्हणत सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता आणि त्यांचा मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

याशिवाय नीना गुत्पा यांनी आजवर प्रत्येक सिनेमात उत्तम अभिनय केला असून त्यांना योग्य जोडीदार मिळाला असल्याचं सतीश कौशिक या मुलाखतीत म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 3:42 pm

Web Title: satish kaushik open up why he proposed neena gupta when she was pregnant kpw 89
Next Stories
1 ३२ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान करणार पहिल्यांदाच बायोपिक?
2 रजनीकांत यांनाही टाकले मागे? एका चित्रपटासाठी विजयने घेतले सर्वाधिक मानधन
3 तारीख पे तारीख! ‘KGF चॅप्टर 2’चं प्रदर्शन पुन्हा रखडलं
Just Now!
X