News Flash

नजर वेधून घेणारी नोज रिंग, कपाळी कुंकू… मिलिंद सोमणचा हटके लूक

मिलिंदचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. सध्या मिलिंदचा एका वेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो पाहून मिलिंदने असा लूक का केला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मिलिंद सोमण लवकरच ‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एक वेगळी भूमिका साकारणार आहे. या वेब शोमधील मिलिंदचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

आल्टबालाजीने मिलिंदचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद शर्टलेस दिसत असून त्याने नाकात नोज रिंग, कपाळी कुंकू लावले आहे. मिलिंदला वेगळ्या लूकमध्ये पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. त्यांनी त्याच्या लूकवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे.

‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये मिलिंद सोमणसोबत अभिनेत्री शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत. हा शो अल्टबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून लवकरच शोचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 2:57 pm

Web Title: see the first look of milind somans character from paurashpur dcp 98 avb 95
Next Stories
1 नेहा कक्करने शेअर केला ‘First Kiss’चा व्हिडीओ, पाहून पती म्हणाला…
2 गोविंदावरुन टोमणा मारताच कृष्णा अभिषेक म्हणाला…
3 कपड्यांमुळे ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सोना मोहापात्रा, म्हणाली…
Just Now!
X