‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचा विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान युसूफ खान याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेने ३० जानेवारी रोजी ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्ता महिला ही डान्सर असून सलमान आणि त्याच्या भावावर तिने आरोप केले आहेत. दुबईत डान्स शो करण्याची ऑफर देण्यासाठी सलमानने संबंधित महिलेला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेी त्याने गैरवर्तन केलं. इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतात असं सलमान म्हणाल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर दुबईतील डान्स शोचं काम दिल्यानंतर सलमान आणि त्याच्या भावाने मिळून बेहरिन इथं गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
Correction: Sexual harassment complaint filed against dancer/choreographer Salman Yusuf Khan in Oshiwara Police Station, Mumbai. Police begin the investigation. #Maharashtra (original tweet will be deleted) https://t.co/7GRK296WqJ
— ANI (@ANI) February 2, 2019
दुबईत सलमानने जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोध केला असता काम सोडून देण्यासाठी धमकीही दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.