बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. शाहरुख त्याच्या अभिनायाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतो. त्यामुळे शाहरुखचा जगभरात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नुकताच शाहरुखने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
शाहरुखने नुकताच बाबा सिद्दीकी इफ्तर यांच्या पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यान शाहरुखने दिग्दर्शक, निर्माता करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटर शेअर केला. हा फोटो शेअर करताना शाहरुखने त्यांचे आभार देखील मानले आहेत. शाहरुखची ही भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Dreamers r good. But if those dreams r not given a direction they mean nothing.These 2 fulfilled every dream I had,over & above every dream they had for themselves.Adi & Karan. Y share this with all? Cos u should know, more important than ur dreams r those who fulfil them for u pic.twitter.com/RzsMRYUMet
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 2, 2019
‘स्वप्न पाहणे ही चांगली गोष्ट आहे. पण या स्वप्नांना योग्य दिशा मिळाली नाही तर ते व्यर्थ आहेत. या दोघांनी माझी स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. आदि आणि करण. मी हे का शेअर करत आहे? कारण स्वप्न पाहण्यापेक्षा ती सत्त्यात उतरणे महत्वाची असतात हे तुम्हाला समजायला हवे’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले.
सध्या शाहरुख अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री कतरिना कैफ देखील काम करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.