News Flash

VIDEO: वरुण धवन झाला ‘देवदास’

शाहरुखने विनोदी शैलीत ट्विट करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ या अत्यंत लोकप्रिय चित्रपटाला नुकतीच चौदा वर्षे पूर्ण झाली. शाहरुख खान, माधुरी दीक्षित-नेने, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला आज इतकी वर्षे उलटूनही देवदास, पारो आणि चंद्रमुखीची पात्रे तितकीच तरुण आणि लोकप्रिय आहेत. या चित्रपटीतील किरण खेर, मिलिंद गुणाजी, जॅकी श्रॉफ यांच्या भूमिकांनाही उल्लेखनीय प्रसिद्धी मिळाली होती. ‘देवदास’च्या सेटपासून संगीत दिग्दर्शनापर्यंत आणि त्यातील कलाकारांच्या वेशभूषेपासून ते संवादापर्यंत सर्वांनाच रसिकांची दाद मिळवली. ‘देवदास’चे मुख्य आकर्षण होते त्यातील संवाद, चाहत्यांप्रमाणेच अभिनेता वरुण धवनलाही ‘देवदास’च्या संवादांची नक्कल करण्याचा मोह आवरता आला नाही, हे एका व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओत माधुरी दीक्षित-नेने आणि वरुण धवन हे कलाकार ‘देवदास’मधील एका संवादाचा ‘डबस्मॅश’ करताना दिसत आहेत.
‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या डान्स रिअॅलिटी शो मध्ये ‘ढिशूम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आलेल्या वरुणने माधुरीसोबत हा ‘डबस्मॅश’ केला खरा, पण त्याची खरी मजा तेव्हा आली जेव्हा या ‘डबस्मॅश’ व्हिडिओवर स्वत: शाहरुखने विनोदी शैलीत ट्विट करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. बॉलीवूडमध्ये ‘देवदास’ चित्रपटाने पंधराव्या वर्षात केलेले पदार्पण, रसिकांमधील त्याची लोकप्रियता, वरुणचा हा ‘डबस्मॅश’ व्हिडिओ आणि त्यावर किंग खानची प्रतिक्रिया हे सारेच सध्या ट्रेंडमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 4:12 pm

Web Title: shah rukh khans reply to madhuri dixit varun dhawans devdas dubsmash is epic
Next Stories
1 दिलजीत दोसांझ आणि परिणिती साकारणार ‘चमेली की शादी’
2 पुद्दुचेरीत सार्वजनिक सुविधांचा वापर करणाऱ्यांना सरकारने दिली ‘कबाली’ चित्रपटाची तिकिटे
3 अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल
Just Now!
X