06 March 2021

News Flash

‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार दिल्याचा शाहिदला आता होतोय पश्चात्ताप

हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला चांगलाच भावला होता

शाहिद कपूर

‘जब वी मेट’, ‘कमीने’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’ आणि ‘पद्मावत’सारख्या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. आता शाहिद त्याचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंग’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटासाठी शाहिदच्या मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. दरम्यान शाहीदने एका चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने खंत व्यक्त केली आहे.

नुकाताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शाहिदला ‘कबीर सिंग’ चित्रपटासंदर्भत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान शाहिदला त्याच्या करिअरमध्ये कोणत्या चित्रपटाला नकार दिल्याचा पश्चाताप होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शाहिदने ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार दिल्याता पश्चाताप होत असल्याचे सांगितले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिदला ‘रंग दे बसंती’मधील सिद्धार्थच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला चांगलाच भावला होता. तसेच ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

‘रंग दे बसंती’ या चित्रपटात अभिनेता आमिर खान, कुमाल कपूर, शरमन जोशी, सोहा अली खान, अतुल कुलकर्णी, आर माधवन आणि अनुपम खेर अशी तगडीस्टार कास्ट होती.

सध्या शाहिद दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणी हिट झाली आहेत. तसेच ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 1:44 pm

Web Title: shahid kapoor regrets for not working in the film rang de basanti avb 95
Next Stories
1 बिग बी यांच्या नातीसोबतच्या नात्याबाबत मिजान जाफरीने केला खुलासा
2 प्राजक्ता माळीचे युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटो, सोबत असलेला मुलगा आहे तरी कोण?
3 चाहत्याच्या मृत्यूमुळे रणवीरला बसला धक्का, शेअर केले सोबतचे फोटो
Just Now!
X