02 March 2021

News Flash

शाहरुखचा इम्तियाज अलीवर आरोप

'द रिंग'च्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखचा दिग्दर्शकावर आरोप

शाहरुखचा इम्तियाजवर आरोप

सध्या शाहरुख इम्तियाज अलीच्या ‘द रिंग’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. जगभरात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. सध्या पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये ‘द रिंग’चे चित्रीकरण सुरू आहे. हे चित्रीकरण सुरू असताना शाहरुखने इम्तियाज अलीवर एक मजेशीर आरोप केला आहे.

‘द रिंग’च्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेत आहे. चित्रीकरणादरम्यानची छायाचित्रे आणि व्हिडीओ शाहरुख समाज माध्यमांवर शेअर करतो आहे. या सर्व गोष्टींना त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाददेखील मिळतो आहे. शाहरुखने नुकताच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लोकांमध्ये उभा राहून डान्स करतो आहे. हा डान्स करताना शाहरुख त्याचे शर्ट वर घेतो आहे. पोटाचे ऍब्स दाखवणारी स्टेप शाहरुख या व्हिडीओमध्ये करताना दिसतो आहे. ‘आता माझे पुरुष दिग्दर्शकदेखील मला अंग प्रदर्शन करायला लावत आहेत. पापी पोटासाठी काय काय करावे लागते’, असे शाहरुखने हा व्हिडीओ शेअर करताना गमतीने म्हटले आहे.

शाहरुखने हा व्हिडीओ शेअर करत इम्तियाजला कोपरखळी मारली आहे. शाहरुखने पहिल्यांदा ओम शांती ओम चित्रपटाच्या एका गाण्यात त्याचे सिक्स पॅक्स ऍब्स दाखवले होते. फरहा खानने त्यावेळी शाहरुखला शर्ट काढायला लावला होता. यानंतर हॅप्पी न्यू इयर चित्रपटातही शाहरुखने शर्ट उतरवला होता. त्यामुळेच आता इम्तियाजनेदेखील आपल्याला प्रदर्शनाची वस्तू बनवल्याचे म्हणत शाहरुखने इम्तियाजची चेष्टा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 7:21 pm

Web Title: shahrukh khan shares video practicing dance during the shoot
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जाण्यास धोनीचा नकार?
2 जॉन अब्राहमकडून चाहत्याच्या कानशिलात?
3 अमृता सिंगला अनिल कपूर का घाबरतोय?
Just Now!
X