News Flash

‘तू तर नाकात गातोस, कोण ऐकतं तुला’, असे म्हणणाऱ्याला महेश काळेंचे सडेतोड उत्तर

जाणून घ्या महेश काळे काय म्हणाले...

आजकाल सोशल मीडियावर कलाकार प्रंचड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. कधीकधी ते त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी देखील माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे देताना दिसतात. पण कधीकधी त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. असेच काहीसे प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्यासोबत झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

महेश काळे यांनी नुकताच फेसबुक अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांनी निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. पण काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : ‘हे काय वागणं आहे’, लग्नाच्या दोन महिन्यात सिद्धार्थ-मितालीमध्ये भांडण?

एका युजरने ‘भिमसेन एकच होऊ शकतात… तू तर नाकात गातो एवढं कर्कश कोण ऐकत कोण तूला…’ या आशयाची कमेंट करत ट्रोल केले होते. ती कमेंट पाहून महेश देखील शांत बसले नाहीत त्यांनी त्या यूजरला चांगलेच सुनावले.

त्या ट्रोलरला उत्तर देत महेश म्हणाले, ‘खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते. तुम्ही सुखरुप रहा.’ महेश यांनी दिलेले उत्तर पाहून अनेकांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 10:41 am

Web Title: singer mahesh kale give perfect replay to troller avb 95
Next Stories
1 काजोलच्या लेकीचा डान्स पाहिला का?, ‘बोले चुडिया’ गाण्यावर नास्याचे ठुमके
2 प्रतिक्षा संपली!,’फॅमिली मॅन-2′ लवकरच येणार भेटीला
3 अमेरिकेतल्या लोकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून हवाय ‘द रॉक’, त्यावर तो म्हणतो,” मला नाही वाटत….”
Just Now!
X