News Flash

पाकिस्तानी अभिनेत्री आरजू खानची हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आरजू खान हिची आज (शनिवारी) काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली आहे.

| September 28, 2013 05:37 am

पाकिस्तानी अभिनेत्री आरजू खान हिची आज (शनिवारी) काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली आहे. येथील एका नाट्यगृहामध्ये सादरीकरण करून आरजू पहाटे घरी परतत असताना ही घटना घडली.
आरजू खान ही तिच्या गाडीने रेहमानपुरा परिसरातून घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. आरजूचा मृतदेह कायदेशीर वैद्यकीय कार्यवाहीसाठी निश्तार रुग्णालयात नेण्यात आला आहे. वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यासंबंधी पुढील तपास चालू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 5:37 am

Web Title: stage actress aarzoo khan gunned down in multan
टॅग : Bollywood,Pakistan
Next Stories
1 पहाः ‘रज्जो’ चित्रपटाचा ट्रेलर
2 ‘डेंग्यू’मुळे रणविर सिंग रूग्णालयात
3 अक्षय कुमारचा ‘बिग बॉस’ डॅनी
Just Now!
X