News Flash

परममित्र जेठालालसोबत सेटवर भांडण?; तारक मेहता यांनी सांगितलं कारण

जाणूघ्या काय आहे भांडणा मागचं कारण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका विनोदी लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यात जेठालाल आणि तारक मेहता यांची जोडी दया बेन आणि जेठालालच्या जोडीपेक्षा ही जास्त लोकप्रिय आहे. या दोघांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमीच दिले जाते. जेठालालची भूमिका दिलीप जोशी आणि तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा साकारत आहेत. जेठालाल कोणत्या कठीण परिस्थितीत अडकला असेल तर तारक मेहता त्याच्या मदतीसाठी लगेच धावून येतो. मात्र, ही मैत्री फक्त शूटिंग करतानाच दिसते, त्या दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा आवडत नाही, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आता शैलेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आमचं भांडण झालं वगैरे अशा बातम्या ऐकून खरचं हसायला येतं. अशा अफवा कोण पसरवत? खरचं आमच्या दोघांमध्ये काही झालेलं नाही,” असे शैलेश म्हणाले.

पुढे ते म्हणाले,” मालिकेत आमचं नातं जसं दिसतं त्याहुन चांगलं नातं आमचं ऑफ स्किन आहे. एवढंच नाही तर काल रात्री आम्ही उशिरा पर्यंत चित्रीकरण करत होतो, तरी सुद्धा त्यानंतर थांबून बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो. सेटवर आम्हाला सगळे बेस्टबडी बोलतात. एवढंच नाही तर आमचा मेकअप रूम सुद्धा एकच आहे. याहून जास्त काय सांगू तुम्हाला?”

गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कोणतीही भूमिका बदलली तरी त्याचा परिणाम हा प्रेक्षकांवर होतो. आता काही दिवसांपुर्वी दया बेन म्हणजेच दिशा वकानी शोमध्ये पुन्हा येणार नाही ही बातमी ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला होता. त्यानंतर जेठालाल आणि तारक मेहतामध्ये भांडणाच्या बातमीने त्यांना हादरून टाकलं होतं. मात्र, आता ही बातमी ऐकल्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 4:37 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah taarak mehta aka shailesh lodha gave the reason about the fight dcp 98
Next Stories
1 “आज काही काम नाही”; साराने शेअर केला पुस्तक वाचतानाचा फोटो
2 प्रत्येक आईला वाढदिवसाला असं गिफ्ट मिळालं पाहिजे, कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा
3 अँकर हिंदीत बोल्यावर, ए. आर. रेहमान यांनी उडवली खिल्ली
Just Now!
X