19 September 2020

News Flash

कॅन्सरग्रस्त ताहिरा कश्यपचं पुन्हा कमबॅक, ट्विट करुन दिली माहिती

आयुष्मानने ताहिराची ही पोस्ट रिट्विट करत तिचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

ताहिरा कश्यप

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप- खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिने स्वत:दिली होती. त्यानंतर तिने मास्टेक्टोमीचे उपचार घेतले असून ती कामावर परतल्याचं तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

ताहिराने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘काम सुरु..प्रिप्रोडक्शन, हॅपी थँक्सगिविंग. आभारी आहे,’ असं म्हटलं आहे. यासोबत तिने तिचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यातच आयुष्मानने ताहिराची ही पोस्ट रिट्विट करत तिचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आयुष्मान प्रत्येक वेळी ताहिराला पाठिंबा दिला असून यंदाच्या वर्षी तिने ताहिरासाठी चक्क करवाचौथचं व्रतदेखील केलं होतं.

दरम्यान, ताहिराने काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून कॅन्सर झाला असल्याची माहिती दिली. तसेच इन्स्टाग्राम पोस्टमार्फत तिनं खुलेपणानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मी ही पोस्ट लिहिली आहे, असं ताहिरानं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 10:58 am

Web Title: tahira kashyap gets back to work after undergoing mastectomy
Next Stories
1 होणाऱ्या नवऱ्यासाठी प्रियांकाची ‘Thanksgiving’ पार्टी
2 The Lion King Trailer : ‘सिम्बा’ परत येतोय!
3 अभिनेत्री उदिता गोस्वामी झाली दुसऱ्यांदा आई !
Just Now!
X