News Flash

..म्हणून हृतिक -टायगर ‘वॉर’ चे एकत्र नाही करणार प्रमोशन

२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून डान्स याचं उत्तम समीकरण असलेला अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफचा ‘वॉर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे दोन अभिनेते जेव्हा ऑनस्क्रीन एकत्र येतील तेव्हा एक वेगळीच जादू पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाती एक गाणे प्रदर्शित झाले. ते पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या चित्रपटाचे प्रमोशन टायगर आणि हृतिक एकत्र करणार नसल्याचे म्हटले जात आहे.

‘वॉर’ या चित्रपटात हृतिक आणि टायगर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. मात्र ते दोघे चित्रपटात एकमेकांच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन दुश्मनीला ऑफस्क्रीन दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘वॉर’ चित्रपटाच्या प्रोमशनदरम्यान हृतिक आणि टायगर एकत्र दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच ‘वॉर’ चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ हे गाणे प्रदर्शित झाले. गाण्यामधील हृतिक आणि टायगरचे एकत्र नृत्य पाहण्यासारखे आहे. या गाण्यासाठी ५०० बेस्ट बॅकग्राऊंड डान्सरची निवड करण्यात आली होती. हृतिक आणि टायगरने या गाण्यासाठी तीन आठवडे मेहनत घेतली असल्याचेही म्हटले जात आहे. सिद्धार्थ आनंदने ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनसीनचा भरणा करण्यात आला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स यामध्ये पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:46 pm

Web Title: thats why hrithik and tiger not going together for war promotion avb 95
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे करणार चित्रपट निर्मीती
2 तुम्ही रानू मंडल यांना घर का दिले नाही? सलमान म्हणाला..
3 ‘बाजीगर’मध्ये शाहरुख शिल्पाचा खून करतो त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही- शाहिद कपूर
Just Now!
X