News Flash

मदतीचा हात पुढे करुनही अक्षय कुमार पिछाडीवर, पाहा लोकप्रियतेत कोणी केली मात

लोकप्रियतेच्या निकषांवर या यादी बनवण्यात आली आहे.

सलमान खान

क्वारंटाइन वेळेत सर्वच कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहेत. काहीजण मदत करत आहेत तर काहीजण व्हिडीओद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत. करोना व्हायरसशी लढण्यासाठी अक्षय कुमारने तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यापाठोपाठ बऱ्याच कलाकारांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. अक्षयची सोशल मीडियावर बरीच वाहवा झाली. मात्र तरीसुद्धा लोकप्रियतेच्या बाबतीत त्याला एका अभिनेत्याने मागे टाकलंय. हा अभिनेता आहे ‘भाईजान’ सलमान खान.

एका लोकप्रिय पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सलमान खान स्टार रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. लोकप्रियतेच्या निकषांवर या यादी बनवण्यात आली आहे. या यादीत अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरी सलमानच्या तुलनेत गुणांनी खूपच मागे आहे. अक्षय कुमारला ८८७ गुण असून सलमान १७१८ गुणांवर आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सलमानचे चाहते जगभरात आहेत. तरुणांमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे ब्रँड सर्किटमध्येही त्याचं नाव प्रसिद्ध आहे. नुकत्याच एका आघाडीच्या कोल्ड्रिंक्सच्या ब्रँडसाठी त्याला अॅम्बेसेडर म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 10:23 am

Web Title: this actor ranked one in star ranking according to popularity ssv 92
Next Stories
1 हे आहे बबड्याचं ‘क्वारंटाइन शेड्युल’
2 Coronavirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या मुलीची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह
3 रामायणात ‘मंथरा’ साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं ‘या’ घटनेनं बदलले संपूर्ण आयुष्य
Just Now!
X