News Flash

प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर समोर आली मोठी माहिती; ‘या’ अभिनेत्याने केलं होतं डेट

'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर विकास गुप्ताने सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक मोठा खुलासा केलाय.

टीव्ही इंडस्ट्रीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे बिग बॉसचा एक्स कंटेस्टंट विकास गुप्ता. ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर विकास गुप्ताने सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक मोठा खुलासा केलाय. विकास गुप्ताने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युषा बॅनर्जीसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठी माहिती दिली आहे.

क्रिएटिव्ह डायरेक्टर विकास गुप्ताने प्रत्युषा बॅनर्जीला डेट केलं होतं आणि ते दोघेही कित्येक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. यावेळी विकासने दोघांच्या ब्रेकअपचं कारण देखील सांगितलं. दोघे रिलेशनशीपमध्ये होती तेव्हापर्यंत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला विकास बायसेक्शुअल असल्याचं माहित नव्हतं. “इतर काही लोकांनी माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी प्रत्युषाला सांगितल्या आणि त्यावरून तिने माझ्यासोबत ब्रेकअप केलं”, असं विकास गुप्ताने सांगितलं. ब्रेकअप झाल्यानंतर विकास बायसेक्शुअल आहे हे प्रत्युषाला कळलं होतं.

यापुढे बोलताना विकास गुप्ता म्हणाला, “इतर काही लोकांमुळे माझं आणि प्रत्युषाचं ब्रेकअप झालं होतं. पण आता मला यात पडायचं नाही. कारण प्रत्युषा आता आपल्यात राहिली नाही. ब्रेकअप नंतर मी तिच्यावर खूप नाराज होतो. त्यानंतर एकदा रस्त्यावर आम्ही भेटलो होतो, त्यावेळी ती मला न पाहताच निघून गेली. तिने मला जाब विचारण्यासाठी भेटायला बोलवलं होतं. मला प्रत्युषा आवडत होती. तिच्यासोबत एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायची इच्छा होती.”

Vikas-Gupta-Pratyusha-Banerjee

यावेळी विकास गुप्ताने प्रत्युषाच्या मृत्यूचा दिवस आठवत तिच्या बॉयफ्रेंडबद्दल देखील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तो म्हणाला, “ज्यावेळी प्रत्युषाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड राहूल राज हॉस्पिटलबाहेर चिप्स खात बसलेला होता. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो, त्यावळी तिथे मकरंद मल्होत्रा होता आणि लोकांना फोन करत होता. राहूलच्या आधी प्रत्युषाने मकरंदला डेट केलं होतं आणि त्या दोघांचं नातं ही खूप चांगलं होतं.”

प्रत्युषा बॅनर्जीनं 2016 साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्यानं तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होतं. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु तिचा कथित प्रियकर राहुल राज सिंह यानं लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं होतं असा कयास पोलिसांनी लावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 6:53 pm

Web Title: vikas gupta and pratyusha banerjee were dating and balika vadhu tv actress know his sexual orientation after break up prp 93
Next Stories
1 ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट?
2 ‘मी स्वयंपाक का शिकला पाहिजे’, लिंगभेदावर विद्या बालन संतप्त
3 पहिल्या पत्नीच्या अफेअर विषयी बोलायला नको होते; राज कुंद्रावर शिल्पा नाराज
Just Now!
X