News Flash

VIDEO: ‘..म्हणून मी मनोज यांची चप्पल ठेऊन घेतली’; आठवण सांगताना पंकज यांना अश्रू अनावर

मनोज यांनी भावूक झालेल्या पंकज यांना प्रेमाने मिठी मारली

मनोज यांनी पंकज यांना प्रेमाने मिठी मारली

विनोदी अभिनेता कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ कधी वादांमुळे तर कधी शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांमुळे कायमच चर्चेत असतो. नुकतेच या कार्यक्रमामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील दोन भन्नाट कलाकार आले होते. हिंदी सिनेसृष्टीबरोबरच सध्या वेबसिरिजच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले मनोज बाजपेयी आणि पंकज त्रिपाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. अनेकांना ठाऊक नसेल पण पंकज त्रिपाठी हे मनोज यांचे खूप मोठे चाहते आहेत. मनोरंजन सृष्टीमध्ये नावारुपास येण्याआधीपासूनच पंकज यांनी मनोज यांचे काम पाहून अभिनयाचे धडे घेतले आहेत. या कार्यक्रमामध्ये पंकज यांचे मनोज यांच्याप्रती असणारे प्रेम दिसून आले. मनोज यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगताना तर पंकज यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर मनोज यांनी पंकज यांना प्रेमाने मिठी मारली.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मनोज यांनी पंकज यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. ‘आम्ही गँग्स ऑफ वासेपूर सिनेमामध्ये एकत्र काम केले. काही वर्षांपूर्वी तुम्ही मौर्या हॉटेलमध्ये थांबला होतात तेव्हा तुमची चप्पल हरवली होती ती मी चोरलेली असं पंकजने मला एकदा बोलता बोलता सांगितले होते,’ असं मनोज यांनी कपिलला सांगितले. त्यानंतर सेटवरील सर्वच जण हसू लागले. यासंदर्भात नंतर लगेच पंकज यांनी स्पष्टीकरण दिले.

‘मी मनोरंजन सृष्टीमध्ये येण्याआधी हॉटेलमध्ये काम करायचो. एकदा मी काम करत असणाऱ्या हॉटेलमध्ये मनोज बाजपेयी रहायला आले होते. तेव्हा मी तेथे स्वयंपाकघरातील मुख्य समन्वयक पदावर कार्यरत होते. त्याकाळी मी छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करायचो आणि त्यामुळेच तेथे काम करणाऱ्या सर्वांना माझी नाटकाची आणि सिनेमाची आवड ठाऊक होती. त्यामुळेच मनोज यांच्या रुममध्ये खाण्याची कोणतीही ऑर्डर आली तर मला कळवण्यात यावे मी स्वत: त्यांना खाणे घेऊन जाईल असं मी सर्वांना सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मी खाण्याची ऑर्डर घेऊन त्यांच्या रुमवर गेलो. मी नाटकांमध्ये काम करतो असं त्यांना सांगितलं. मी रुममधून निघताना त्यांच्या पाया पडलो,’ अशी आठवण पंकज यांनी सांगितली. ‘दुसऱ्या दिवशी मनोज यांनी रुममधून चेक आऊट केलं. त्यावेळी ते त्यांच्या स्लीपर्स विसरले. यासंदर्भात मला हाऊस किपिंगवाल्यांनी सांगितले. त्यावेळी मी त्यांना त्या स्लीपर्स हॉटेल प्रशासनाकडे न देता माझ्याकडे देण्यास सांगितल्याचे,’ पंकज पुढे म्हणाले. या स्लीपर्स स्वत:कडे ठेऊन घेण्यामागील कारणाबद्दल बोलताना ते भावूक झाले. ‘एकलव्याप्रमाणे मी जर त्यांच्या खडावा पायात घातल्या असत्या तर..’ एवढं बोलून पंकज यांना रडू आले. मनोज यांनी लगेच जागेवरुन उठून पुढे जात पंकज यांना मीठी मारली. या प्रसंगानंतर सर्व प्रेक्षकांनी उठून टाळ्या वाजवत या गुरु-शिष्याच्या नात्याला सलाम केला.

मनोज आणि पंकज दोघेही सध्या वेगवेगळ्या सिनेमांबरोबरच वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नेटफिक्सवर पंकज यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सिक्रेड गेम्स’चे दुसरे पर्व चांगलेच चर्चेत आहे. तर मनोज यांची प्रमुख भूमिका असणारी ‘अॅमेझॉन प्राइम’वरील ‘कॉमन मॅन’ ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 11:24 am

Web Title: watch kapil sharma show pankaj tripathi gets teary eyed while talking about manoj bajpayee scsg 91
Next Stories
1 Photo : अशा पद्धतीने अ‍ॅमीने केलं बाळाचं स्वागत
2 ‘शेरास सव्वाशेर’! रितेशच्या ‘त्या’ ट्विटवर जेनेलियाचं सडेतोड उत्तर
3 ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्रीच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X