बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. प्रसारमाध्यमे अनेकदा थेट किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचे आगामी चित्रपट, खासगी जीवनातील घडामोडी आणि रिलेशनशिप यासंदर्भात प्रश्न विचारतात. सेलिब्रिटीसुद्धा कौशल्याने या प्रश्नांची उत्तरे टाळतात किंवा हटके उत्तर देऊन पत्रकारांनाच पेचात पाडतात. आज तुम्हाला आम्ही असाच एक गमतीशीर किस्सा सांगणार आहोत. हॉलिवूड मीडियाने जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला एक प्रश्न विचारला, ज्यावर तिने असे काही उत्तर दिले की स्टुडिओमध्ये टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला आणि तिच्या उत्तराने पत्रकारही चक्रावून गेला.
हॉलिवूड व्यतिरिक्त जगभरात प्रसिद्ध असलेला कॉमेडीयन, लेखक, निर्माता आणि सूत्रसंचालक डेविड लेटरमनच्या एका शोमधील हा किस्सा आहे. ऐश्वर्या राय आणि डेविड लेटरमनची ही खूप जुनी मुलाखत आहे. मात्र, या शोमध्ये तिने दिलेल्या उत्तरांचा उल्लेख आजही अनेकदा केला जातो. मुलाखतीत बरीचशी प्रश्नोत्तरे ही गमतीशीर पद्धतीनेच झाली, मात्र हसता हसता ऐश्वर्याने डेविडचे तोंडच बंद केले.
वाचा : वाढदिवशी प्रभासच चाहत्यांना देणार ‘सरप्राइज’
डेविड लेटरमनने ऐश्वर्याला विचारले की, ‘तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहतेस हे खरे आहे का आणि भारतात मोठे झाल्यानंतरही मुले आई-वडिलांसोबतच राहतात का?’ या प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या म्हणालेली की, ‘हो आणि ही काही मोठी गोष्ट नाही. भारतात ही सामान्य बाब आहे आणि आमच्या देशात रात्री एकत्र जेवण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागत नाही.’ तिचे हे स्मार्ट उत्तर ऐकून डेविड काही वेळासाठी गप्पच झाला आणि स्टुडिओमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट होऊ लागला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 4:25 am