04 March 2021

News Flash

लग्नानंतर दीपिका ऑनस्क्रीन किसिंगचे सीन थांबवणार का ?

लग्न, वेडिंग रिसेप्शन या सगळ्यानंतर आता या दीप-वीरने करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण

बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. इटलीत पार पडलेल्या या शाही विवाहाची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर होती. लग्नाप्रमाणेच त्यांनी आयोजित केलेल्या वेडिंग रिसेप्शनचीही तेवढीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. लग्न, वेडिंग रिसेप्शन या सगळ्यानंतर आता या दोघांनी त्यांच्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. रणवीर त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाकडे वळला आहे.तर दीपिकाही तिच्या आगामी प्रोजेक्टकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाला ऑनस्क्रीन किसिंग देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिकाने दिलेल्या उत्तरामुळे साऱ्यांच्या नजरा दीपिकाकडे वळल्या.

‘दीपिका आता तू रणवीरसोबत विवाहबद्ध झाली आहेस. त्यामुळे आता चित्रपटांची निवड करताना किंवा एखाद्या चित्रपटामध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार का ? तसंच तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑनस्क्रीन नो किसिंग क्लॉज असं नमूद करणार का’ ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर दीपिकाने ‘शी.. ‘अशी प्रतिक्रिया दिला.

दीपिकाने हा प्रश्न ऐकल्यानंतर तात्काळ तिने अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे दीपिकाने सध्या तरी या सीनविषयी कोणताही विचार केला नसल्याचं दिसून येत आहे.

दीपिकाने नुकतीच ‘निकलोडियन किड्स चॉइस अॅवॉर्ड २०१८’ सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने रणवीरच्या ‘सिम्बा’विषयीही तिचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. रणवीर सध्या त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे.त्यामुळे आम्ही आता तरी आमचं पूर्ण लक्ष आमच्या करिअरवर केंद्रीत केलं आहे. ‘सिम्बा’ प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही हनिमून आणि फॅमेली प्लानिंगविषयी विचार करु असं दीपिकाने सांगितलं.

दरम्यान, दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित असून दीपिका या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 5:29 pm

Web Title: will deepika stop kissing on screen after marrying ranveer here is her response
Next Stories
1 Photo : ‘झुंड’च्या सेटवर बिग बींची फुटबॉल विश्वचषकाची तयारी
2 Video : अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 Photo : ‘मणिकर्णिका’च्या मुख्य सेनापतीची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
Just Now!
X