News Flash

‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलता है’ मालिकेत नैतिक ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अभिनेता करण मेहराला अटक केली आहे. करणची पत्नी अभिनेत्री निशा रावलने करणसोबत झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. एएनआय वृत्तसंस्थेने या बद्दलची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा यांच्या वैहाहिक आयुष्यात दरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र निशाने या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हंटलं होतं.

अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपोसून सोबत आहेत. २०१२ सालात त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांना एक ४ वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव काविश असं आहे. करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोलंल जात होत. यावर करण मेहराने देखील स्पष्टीकरण दिलं होतं.

आणखी वाचा: अभिनेता जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा मॉडेलचा आरोप

करणने दिलं होतं स्पष्टीकरण
“नाही हे अगदी खोटं आहे. मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. मात्र आता मी मुंबईला परतलो असून सध्या क्वारंटाईन आहे. माझ्या सेटवर काही जणांना करोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. मी घरातच आहे. दोन तीन चाचण्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी माझी तब्येत थोडी बिघडली आहे. म्हणून मी घरातच क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे.” असं म्हणत करणने सर्वकाही सुरळीत असल्याचं करणने स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 11:11 am

Web Title: yeh rishta kya kahalata hai actor karan mehera arrested in mumabi after wife nisha filed a complaint kpw 89
Next Stories
1 अभिनेता जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा मॉडेलचा आरोप
2 “सोनू सूद भारताचा पंतप्रधान झाल्यास…”
3 विद्यार्थीनीलाच करत होता डेट; ‘अशी’ आहे आर माधवनची प्यार वाली लव्ह स्टोरी
Just Now!
X