सध्या संपूर्ण देशात करोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच टोळधाडीमुळे निर्माण होणारे कृषिसंकट देशासमोर उभे राहिले आहे. राजस्थाननंतर पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणामध्ये टोळधाड आली आहे. यावर बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने तिचे मत मांडले आहे. तिने हा देवाचा प्रकोप आहे असे सुचित करणारे ट्विट केले होते. इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ असणाऱ्या कुराणमधील काही ओळी तिने ट्विट केल्या होत्या.
सोशल मीडियावर झायराने बुधवारी ट्विट केले. जगभरात सध्या उद्धवलेल्या परिस्थितीचा दाखला देत तिने कुरणामधील ओळी ट्विट केल्या. यामध्ये तिने पूरासारख्या नैसर्गिक संकटांपासून ते टोळधाडीपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करत हे दैवी संकेत असल्याचे म्हटले होते. तसेच मानव या संकेतांकडे दुर्लक्ष करतोय असा इशाराही तिने ट्विटमध्ये दिला होता.
If one wonders how does a millenial who was offered an opportunity in uber cosmopolitanism, end up with so much bigotry and hate, she is mentioning the source also. pic.twitter.com/k3FOZrRvub
— Vikas Saraswat (@VikasSaraswat) May 27, 2020
तिचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. तिला अनेकांनी जेव्हा या टोळधाडीमुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल आणि त्यांचे पिक खराब होईल तेव्हा या ट्विटचा काय अर्थ असेल असे असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी ‘साप देखील दंश केल्यानंतर पळून जातो’ असे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने झायराने करिअरची सुरुवात केली होती. तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. पण काही दिवसांपूर्वीच तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठेकला. पण त्यानंतरही ती सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडत असते. नुकताच केलेल्या एका पोस्टमुळे झायरा पुन्हा एकदा चर्चेतआहे. या ट्विटनंतर झायराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने काही वेळातच तिचे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.
झायराचा ‘द स्काय इज पिंक’ हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने अभिनयाच्या प्रवासाला रामराम ठोकला. पण तिच्या या निर्णायानंतरही तिने सोशल मीडियाद्वारे अनेकांवर निशाणा साधला होता.