Miss Universe 2017 : ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या रोश्मिताबद्दल ७ खास गोष्टी

मिस युनिव्हर्स २०१७मध्ये यंदा परिक्षकांच्या रांगेत भारतीय सुंदरी सुश्मिता सेनही आहे.

'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत रोश्मिता हरिमुर्थी ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. (छाया सौजन्यः गुगल)

‘मिस युनिव्हर्स’ हा एक मानाचा किताब आहे. भारताकडून सुष्मिता सेनने १९९४ साली तर लारा दत्ताने २००० साली हा किताब पटकाविला होता. गेल्या १७ वर्षांपासून भारताकडे हा किताब आलेला नाही. आपल्याकडे हा किताब पुन्हा यावा याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत रोश्मिता हरिमुर्थी ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. जर रोश्मिताने हा किताब पटकाविला तर भारताची गेल्या १६ वर्षांची प्रतिक्षा त्यामुळे संपेल. ‘मिस युनिव्हर्स २०१७’ ही स्पर्धा फिलीपिन्सची राजधानी मनीला येथे ३० जानेवारी २०१७ला होणार आहे. विशेष म्हणजे मिस युनिव्हर्स २०१७मध्ये यंदा परिक्षकांच्या रांगेत भारतीय सुंदरी सुश्मिता सेनही आहे.

‘मिस युनिव्हर्स २०१७’ स्पर्धेत सर्व स्पर्धक स्विमसूट, इव्हनिंग गाउन आणि त्यांच्या देशाच्या पारंपारिक पोशाखात दिसतील. या स्पर्धेची सुरुवात गुरुवारी झाली. मिस युनिव्हर्सच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार टॉप १२ स्पर्धकांची ‘पेजन्ट नाइट’साठी निवड केली जाईल. फिलीपिन्सच्या पसी शहरात मिस युनिव्हर्सच्या पहिल्या राउंड झाला. यात स्पर्धकांनी परिक्षकांसमोर इव्हनिंग गाउनमध्ये रॅम्प वॉक केला. त्यानंतर सर्व स्पर्धकांनी स्विमसूटमध्ये रॅम्प वॉक केल्यानंतर पारंपारिक पोशाखातील राउंडला सुरवात झाली.

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता हिने रोश्मितासाठी ट्विट केले असून, तिच्यासाठी मत देण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.

१. रोश्मिता ही बंगळुरु येथे राहणारी असून तिला कन्नड भाषेचे चांगलेच ज्ञान आहे.

https://www.instagram.com/p/BPoWNswhKlN/

२. २२ वर्षीय रोश्मिता ही बंगळुरुच्या माउंट कार्मेल कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

https://www.instagram.com/p/BO9zOjPhxCw/

३. इंटरनॅशनल बिजनेसची विद्यार्थिनी असलेली रोश्मिता सध्या मास्टर डिग्री करत आहे.

https://www.instagram.com/p/BPmbcP-BQdL/

४. रोश्मिताला सामाजिक कार्याचीही आवड आहे. तिने इको फाउन्डेशन फॉर सस्टेनेबल अल्टरनेटिव्हसाठी एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते.

https://www.instagram.com/p/BO30P_3hM8l/

५. रोश्मिताला नृत्य, बागकाम आणि स्विमिंगची आवड आहे.

https://www.instagram.com/p/BOxKI0eh6op/

६. रोश्मिताने याआधी ‘यामाहा फेसिनो मिस दिवा २०१६’चा किताब पटकाविला आहे.

https://www.instagram.com/p/BOgnsBhBUXm/

७. सप्टेंबर २०१६ ला आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस इंडिया स्पर्धेत रोश्मिता’ने १५ स्पर्धकांना मागे टाकत हा किताब पटकाविला होता.

https://www.instagram.com/p/BPiFtP8hbWZ/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 7 rare known facts of miss universe 2017 participant roshmitha harimurthy

ताज्या बातम्या