छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील सर्वच पात्र ही कायम चर्चेत असतात. पण अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी अरुंधतीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेधा जांबोटकर यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत विद्या जोगळेकर म्हणजेच अरुंधतीच्या आईची भूमिका या ज्येष्ठ अभिनेत्री मेधा जांबोटकर साकारत आहेत. नुकतंच मिलिंद गवळी यांनी मेधा जांबोटकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात त्यांनी मेधा जांबोटकर यांच्यासोबतच ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीनचा एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक भावूक पोस्टही शेअर केली आहे.

“वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण…”, मिस युनिव्हर्स हरनाझ संधूला झालाय ‘हा’ गंभीर आजार

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“मेधा ताईंसोबत काम करताना खूप आनंद होतो. त्या नेहमी आनंदित, उत्साही आणि मस्ती करण्याच्या मूडमध्ये असतात. मेधाताईंचा चेहराच इतका सोज्ज्वळ आणि प्रेमळ आहे त्यांना पाहिलं की कोणालाही आपल्याला माया लावणारी, आपली एखादी मावशी किंवा आपली प्रेमळ आत्या, किंवा जीव लावणारी आपली आई, असंच वाटतं.

माझ्या अतिशय मायाळु सासुबाई मेधा ताईं सारख्याच होत्या, मला एक्टिंग मध्ये यश मिळावं म्हणून त्या रोज माझ्यासाठी 5000 स्वामी समर्थांचा जप करायच्या. मेधाताई ना पाहिलं की मला त्यांची खुप आठवण येते, अशाच त्या पण मिश्किल होत्या.

“आई कुठे काय करते “च्या सेटवर मेधाताई क्वचितच येतात, त्यांचे फार कमी सीन्स त्या घरामध्ये असतात, माझे आणि त्यांचे तर खूपच कमी, पण ज्या ज्या वेळेला मेधाताई सेटवर येतात तेंव्हा, संपूर्ण सेटचं वातावरणच बदलून जातं, आमचं शूटिंग चालू असेल आणि त्यांची जर एन्ट्री झाली तर थोडावेळ शूटिंग थांबतं, गोंगाट धमाल-मस्ती सुरू होते, वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि मग शूटिंगला परत सुरुवात होते, मेधाताई अरुंधती च्या सोशिक आईंचा रोल करतात, (इतकी सोशिक आई की मी नमिताला सांगतो की माझे त्यांना त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर लोकं जोड्याने मला मारतील), पण त्या स्वतः अजिबात तशा नाहीयेत, अगदी इमोशनल सिन सुद्धा करताना त्यांचा मिश्कीलपणा चालूच असतो,

हा जो आमच्या दोघांचा व्हिडिओ आम्ही काढलाय, तो त्यांच्याच डोक्यातली कल्पना आहे, आपण स्क्रीन वर कसे आहोत आणि आपण प्रत्यक्षात कसे वागतो, त्याचा आपण एक व्हिडिओ काढू असं त्या म्हणाल्या. प्रथमेश जो 2nd unit कॅमेरामॅन आहे त्यालाच त्यांनी हा व्हिडीओ काढायला सांगितला. त्या खरंच आमच्या सगळ्यांच्या stress buster आहेत….

मी जेव्हा माहीमला राहत होतो, तेव्हा मेधा ताईंच्या आई मनोरमा वागळे त्यासुद्धा माहीम मध्येच राहत होत्या, शितलादेवी मंदिरात त्या कधीतरी दिसायच्या, त्यांना मी लहानपणापासून टीव्हीवर पाहिलं होतं, प्रत्येक वेळेला त्या दिसल्या मी त्यांना जाऊन नमस्कार करायचो, मला त्यांच्याबरोबर काम करायचा कधी योग आला नाही पण त्यांच्या लेकी बरोबर काम करायचं भाग्य मला लाभलं. “”ऋणानुबंध” म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असे मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांना लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.