बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत बिग बी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये अमिताभ त्यांच्या गाडीत बसल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला बॉलिवूड अभिनेता आमिर खान दिसत आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ म्हणाले, “…आणि मी निघणार होतो तेवढ्यात… माझ्या कारची खिडकी ठोठावली आणि तो होता आमिर! एकाचवेळी इतके दिग्ग्ज मित्र भेटले!”

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पाहा फोटो

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

अमिताभ हे सध्या हैदराबादमध्ये शूटिंग करत आहेत. तिथले अनेक फोटो बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमिताभ सध्या प्रभाससोबत एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी व्यस्त आहेत. दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात दीपिकाही मुख्य भूमिकेत आहे. दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

आणखी वाचा : हा शरद पोंक्षे तूच ना? जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी केला सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्याशिवाय या चित्रपटात दिशा पटानी देखील आहे. याशिवाय बिग बी ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसणार आहे. अमिताभ यांच्याशिवाय या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिव’ ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.