बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक गेल्या काही दिवसांपासून दसवी या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा अभिनय बिग बींना प्रचंड आवडला. त्यानंतर बिग बींनी अभिषेकला त्याचा उत्तराधिकारी घोषित केले. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी अभिषेकची तुलना अमिताभ यांच्याशी केली. त्यानंतर अभिषेकने त्या नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिले आहे.

नेटकऱ्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत अभिषेकची तुलना अमिताभ यांच्याशी केली आहे. त्यावर अभिषेक उत्तर देत म्हणाला, धन्यवाद पण…कधी नाही. बाप, बाप होता है. और रिश्ते में वो हमारे…बाकी तुम्हाला माहित आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी अभिषेकचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा : “मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि आझमी…”; केआरकेचं ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेकचा ‘दसवी’ हा चित्रपट ७ एप्रिल रोजी जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. अभिषेकने या चित्रपटात दमदार भूमिका करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्युनियर बच्चनचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनसोबत यामी गौतम, निम्रत कौर यांच्या अभिनयाचे देखील कौतुक होतं आहे.