स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे. एवढचं नव्हे तर आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले.

अजिंक्य देव म्हणाले, “एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का याची भीती देखिल होती. मात्र माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे. इतिहासावरच्या प्रेमापोटीच हे शक्य झालं आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं असं मला वाटतं.” अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
ajinkya-dev
(Photo- facebook/ajinkya r dev)

बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खुपच उत्सुक आहेत. ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.” असं अजिंक्य देव म्हणाले.